..................
जिल्हा क्रीडा संकुलावर खेळाडूंची गर्दी
वाशिम : लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल खुले करण्यात आले आहे. या मैदानावर आता सकाळ, सायंकाळच्या सुमारास खेळाडूंची गर्दी होत आहे.
..................
वाहन परवाना मिळण्यास विलंब
किन्हीराजा : लॉकडाऊनमुळे वाहन परवाना मिळण्यास अर्ज केलेल्या अनेकांना परवाना मिळालेलाच नाही. हा प्रश्न आता मार्गी लागला असून, लवकरच परवाने मिळतील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सोमवारी प्राप्त झाली.
.....................
सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अद्याप पूर्णत: निवळलेले नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना २८ फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवण्यात आल्या. नागरिकांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने सोमवारी केले.
.......................
विवरणपत्र वेळेत सादर करा
वाशिम : शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी तिमाही कालावधीचे ई-आर-१ विवरणपत्र वेळेत सादर करावे, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
........................
नियमित पाणी पुरविण्याची मागणी
वाशिम : शहरातील अल्लडा प्लॉट परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित आहे. यामुळे रहिवासी हैराण झाले असून, नियमित पाणी पुरविण्याची मागणी सुनील मुळे यांनी नगरपरिषदेकडे शुक्रवारी केली.
.....................
‘रोहयो’ची कामे थांबली; मजूर हैराण
मेडशी : मालेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामांमध्ये घोटाळा झाला. यामुळे कारवाईचे सत्र सुरू असून ‘रोहयो’ची कामे थांबली आहेत. रोजगार नसल्याने खरे मजूर मात्र हैराण झाले आहेत.
ग्रामीण प्रवाशांना कोरोनाचा विसर
जऊळका रेल्वे : येथून मालेगाव व शेलूबाजारकडे अवैध प्रवाशी वाहतूक केली जात आहे. ही वाहने खचाखच भरून जात असून, ग्रामीण प्रवाशांना कोरोनाचा पूर्णत: विसर पडल्यागत स्थिती निर्माण झाली आहे.
.................
‘त्या’ दलालावर कारवाईची मागणी
मालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथील शेतकऱ्यांचा संत्रा परस्पर विकणाऱ्या हैद्राबाद येथील दलालावर मालेगाव पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी तक्रारकर्ते शेतकरी लक्ष्मण राऊत, महादा राऊत, संतोष राऊत, संतोष केळे, मोतीराम सोनुने या शेतकऱ्यांनी सोमवारी केली.
................................
वाशिम रेल्वे स्थानकावर शुकशुकाट
वाशिम : काचीगुडा-अकोला-नरखेड ही इंटरसिटी एक्स्प्रेस मकरसंक्रांतीपासून पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, पूर्णत: ‘आरक्षित’च्या धोरणामुळे प्रवासी मिळत नसून, रेल्वे स्थानकावर शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे.
...............
बसथांब्यावर वाहतुकीचा तिढा
वाशिम : शहरातील अकोला नाका येथे वाशिमवरून अकोलाकडे जाणाऱ्या एसटी बस थांबतात. यामुळे मात्र मुख्य चौकातील वाहतूक विस्कळीत होत असून, थांबा हलविण्याची मागणी नीलेश धाबे यांनी सोमवारी आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली.