वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शेतकरी धडकले वाशिम तहसिलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:48 PM2018-10-16T13:48:21+5:302018-10-16T13:49:11+5:30
वाशिम : यावर्षीची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांसह वाशिम, मंगरूळपीर युवक काँग्रेसचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्यांनी १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यावर्षीची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांसह वाशिम, मंगरूळपीर युवक काँग्रेसचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्यांनी १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. पावसात खंड पडल्याने पिकांच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत आहे. खरिप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांना विविध कारणांमुळे जबर फटका बसला आहे. भारनियमन, प्रकल्पांतील अल्प जलसाठा यामुळे रब्बी हंगामही संकटात सापडला आहे. अशा अवस्थेत जिल्हा दुष्काळसदृश परिस्थितीच्या उंबरठ्यावर असताना शासनाने केवळ रिसोड तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी वाशिम पंचायत समितीच्या सदस्यांसह शेतकरी, वाशिम-मंगरूळपीर युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली. शासनाची फसवी कर्जमाफी योजना, फसवी हमीभाव योजना, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव आदींमुळे शेतकरी अगोदरच वैफल्यग्रस्त असून, शेतकºयांना दिलासा म्हणून संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, अशी मागणी वाशिम- मंगरूळपीर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गोटे, वाशिम पंचायत समितीचे माजी सभापती विरेंद्र देशमुख, बाळासाहेब रोकडे, बाळासाहेब लेमाणे, शे. इरफान शे. सुलतान, सिद्धार्थ सावध, गोपाल सावके, जय सावके, ईश्वर राठोड, गजानन वायचाळ, राम इढोळे, संदीव शिंदे, पंढरी जाधव यांच्यासह शेतकºयांनी केली.