मानोरा : पोहरादेवी येथे ३० खाटाचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचे आदेश आराेग्य मंत्री राजेश टाेपे यांनी दिल्याची माहिती पाेहरादेवी येथील जितू महाराज यांनी दिली.
पाेहरादेवी येथील मंहत जितेंद्र महाराज यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जालना येथे ६ जून राेजी भेट घेऊन पोहरादेवी हे बंजारा समाजाची काशी असल्यामुळे संपूर्ण देशातून बंजारा समाज बांधव या ठिकाणी येतात. या ठिकाणी असलेली आरोग्य व्यवस्था कमी पडत असल्याचे महाराजांनी आराेग्यमंत्री यांना सांगितले व या ठिकाणी ३० खाटांचे व ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता असल्याची मागणी केली. ना. टोपे यांनी ताबडतोब वाशिम जिल्ह्यात शल्यचिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांच्याशी फोनवरून ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव मागविला व त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगितले. या रुग्णालयासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करू, असे आश्वासन यावेळी दिल्याचे जितू महाराज यांनी सांगितले. या वेळी मुख्याधापक कुंदन राठोड जालना, सामाजिक कार्यकर्ते श्रीराम जाधव अंबड, गोविंद भाऊ राठोड, मनोज राठोड व पिका आडे पोहरादेवी हे उपस्थित होते.