सुनील काकडे वाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत गत वर्षभरात जिल्ह्यात ३६४ हेक्टरवर स्थापन झालेले १८ शेतकरी गट पूर्णत: सक्रिय करण्यात "आत्मा"ला (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) अद्याप यश मिळालेले नाही. परिणामी, जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या शेतमाल उत्पन्नाचे प्रमाण आजही नगण्य असल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार, ह्यआत्माह्ण अंतर्गत २०१६-१७ च्या खरीप हंगामापासून प्रत्येक जिल्ह्यात गटनिहाय शेतकऱ्यांची निवड करून त्यांना सेंद्रिय पद्धतीने अन्नधान्य, फळे, भाजीपाला पिकविण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यासाठी लागणारे मार्गदर्शन, प्रशिक्षण त्यांना देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यात ह्यआत्माह्णअंतर्गत वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव या सहा तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५० शेतकऱ्यांचे तीन याप्रमाणे १८ गट स्थापन झाले आहेत. या माध्यमातून ९०० एकर अर्थात ३६४ हेक्टरवर सेंद्रिय शेती फुलायला हवी होती. मात्र, बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांचा अपवाद वगळल्यास विविध स्वरूपातील अडचणींमुळे सेंद्रिय शेतीला जिल्ह्यात अद्याप चालना मिळालेली नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे सद्यस्थितीत या अभियानात सहभागी एकाही शेतकऱ्याच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने कुठल्याच प्रकारचे उत्पादन काढणे सुरू नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राष्ट्रीय शेती शाश्वत अभियानाचा मूळ उद्देश बहुतांशी असफल ठरल्याचे सिद्ध होत आहे. शेतीतून अधिक उत्पन्न घेण्याच्या हव्यासापायी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. यामुळे मात्र शेतीच आरोग्य धोक्यात सापडले असून, ते टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी शेतातील माती आणि पाण्याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. असे असताना वाशिम जिल्ह्यात अद्याप माती परीक्षणासाठी शासकीय प्रयोगशाळा उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आजही माती परीक्षणासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अथवा करडा (ता. रिसोड) येथील कृषी विज्ञान केंद्रावरच विसंबून राहावे लागत आहे. जिल्ह्याला मृद सर्वेक्षण, मृद चाचणी प्रयोगशाळा मंजूर झाली. यासाठी लागणारा निधी आणि साहित्यदेखील मिळाले असताना प्रयोगशाळा अद्याप सुरू होऊ शकली नाही. शाश्वत शेती अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय खत कसे तयार करायचे, याचे प्रशिक्षण देण्याची तरतूद आहे. मात्र, त्याची प्रशासकीय पातळीवरून अंमलबजावणी केली जात नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातच निंबोळी अर्क तयार करणे, दशपर्णी, जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक ह्यआत्माह्णच्या माध्यमातून व्हायला हवे. याशिवाय माती परीक्षण, पाणी परीक्षणाची गरज आणि त्याचे महत्त्व याअंतर्गत शेतकऱ्यांना पटवून द्यायला हवे; परंतु असे कुठलेच उपक्रम "आत्मा" अंतर्गत सुरू नाहीत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.- रवी मारशेटवारशेतकरी, वाशिम
सेंद्रिय पद्धतीच्या शेतमाल उत्पन्नाचे प्रमाण नगण्य!
By admin | Published: May 11, 2017 6:59 AM