शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर संघटनेची प्रशासनाशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 7:05 PM

वाशिम: दिव्यांगांना विविध योजनांसाठी अर्ज सादर करताना येणाऱ्या अडीअडचणींबाबत अखिल भारतीय छावा संघटना तसेच राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दिव्यांगांना विविध योजनांसाठी अर्ज सादर करताना येणाऱ्या अडीअडचणींबाबत अखिल भारतीय छावा संघटना तसेच राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली, अशी माहिती महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनिष डांगे यांनी बुधवारी दिली.शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या निकषात बसणाऱ्या १०० टक्के व ९० टक्के दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थींना आॅनलाईन अर्ज करतांना अनेक अडचणी येत आहेत. सेतु केंद्रामधून अर्ज करावा लागतो. हा अर्ज आॅनलाईन तयार करत असतांना जे सॉफ्टवेअर वापरण्यात येत आहे त्यामध्ये दिव्यांगाची ८० टक्केपर्यत टक्केवारी स्विकृत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ८० टक्क्याच्या पुढे १०० टक्क्यापर्यत कोणतीही टक्केवारी स्विकृत करण्याची सुविधा नाही. त्यामुळे लाभार्थीचा अर्ज तयार होत नसल्यामुळे त्या लाभार्थींना योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. पर्यायाने सदर लाभार्थी वंचित राहू शकतात, ही वस्तूस्थिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनात आणून दिली. त्यामुळे या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक तो बदल तात्काळ करण्यात यावा. जेणेकरुन ८० टक्क्च्यावर १०० टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या लाभार्थींना लाभ मिळेल व या तांत्रिक अडचणीमुळे तहसिल कार्यालयामध्ये अर्ज स्विकारण्यास अडचण येणार नाही. याकरीता पर्याय म्हणून योजना राबविणाऱ्या कक्षाने संबंधीत दिव्यांग अर्जदाराचे आॅनलाईन अर्ज स्विकारुन त्यांना लाभ द्यावा. याकडे दुर्लक्ष झाल्यास राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, छावा संघटना व सिंहगर्जना युवक अपंग विकास सामाजीक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी छावाचे विदर्भ अध्यक्ष गणेश गांजरे, राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनिष डांगे, जिल्हाध्यक्ष बेबी कोरडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.