वाशिम : सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील क्लब या समाजसेवी संस्थेने एका लहान अनाथ बालिकेला आश्रय दिला.
केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ग्रुपचे नेत्रहीन दिव्यांग असलेले गायक दशरथ जोगदंड यांची पत्नी उज्ज्वला जोगदंड हिचे अकस्मात निधन झाल्याने केवळ एक महिन्याची बालिका तृप्ती या मुलीला इनरव्हील क्लबच्यावतीने दत्तक घेण्यात आले. जन्मदाता पिता दशरथ हा नेत्रहीन असून आईचे छत्र हरविलेल्या तृप्ती या मुलीला पुढील संगोपनासाठी इनरव्हीलने दत्तक घेतले. वडील अंध असल्यामुळे मुलीच्या भवितव्याचा विचार करून येथील इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी केकतउमरा येथे जाऊन इनरव्हील क्लब अध्यक्ष प्रा.डॉ. मेघा देशमुख, डॉ. शुभांगी दामले, मंगला शिंदे, संध्या राठोड यांनी स्वर्गीय उज्ज्वला जोगदंड यांना क्लबच्यावतीने अभिवादन केल्यानंतर छोट्या बाळासाठी कपडे, दुधाची बॉटल व इतर काही साहित्य देण्यात आले. बाळाच्या गरजेचे हे सर्व साहित्य संध्या राठोड यांच्याकडून देण्यात आले. याप्रसंगी क्लबचे पदाधिकारी व चेतन सेवांकुर येथील उचितकर कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.