शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

वाशिम जिल्हय़ातील १२५ पैकी ५0 प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’!

By admin | Published: August 04, 2016 2:01 AM

२४ तासांत जिल्ह्यात सरासरी १५.८५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद .

वाशिम,दि. ३- गत चार दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ५0 प्रकल्प ह्यओव्हर फ्लोह्ण झाले असून, एकूण १२५ जलप्रकल्पांत सरासरी ५६.८६ टक्के जलसाठा झाला आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १५.८५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे.वाशिम जिल्ह्यात एकूण १२५ प्रकल्प असून, यामध्ये तीन मध्यम व १२२ लघू प्रकल्प आहेत. गत चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस असल्याने जलाशयांमधील जलसाठय़ात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी या मध्यम प्रकल्पाने १00 टक्क्याचा आकडा गाठला असून, सांडव्यावरून पाणी वाहत आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या सोनलमध्ये ८0 टक्के व अडाण प्रकल्पात ६२.३६ टक्के जलसाठा आहे. उर्वरित १२२ लघू प्रकल्पात सरासरी ५३.५८ टक्के जलसाठा आहे. तीन मध्यम प्रकल्पात सरासरी ६७.७८ टक्के जलसाठा आहे.वाशिम तालुक्यातील ३१ लघू प्रकल्पात सरासरी ४८.३४ टक्के जलसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील २२ प्रकल्पात ५४.८७ टक्के, रिसोड १७ प्रकल्पात १६.९७ टक्के, मंगरुळपीर १५ प्रकल्पात ७३.0७ टक्के, मानोरा २३ प्रकल्पात ७९.५३ टक्के तर कारंजा तालुक्यातील १४ प्रकल्पात सरासरी ५५.0६ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील ३५ प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहेत. ७५ ते ९0 टक्क्यादरम्यान जलसाठा असणार्‍या प्रकल्पांची संख्या १९ आहे. रिसोड तालुक्यात एकूण सरासरीच्या ६७ टक्के जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. तथापि, प्रकल्प परिसरात पावसाचा जोर अधिक नसल्याने प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा नाही. सर्वात कमी जलसाठा रिसोड तालुक्यातील प्रकल्पात सरासरी केवळ १६.९७ टक्के आहे. सर्वाधिक जलसाठा मानोरा तालुक्यातील प्रकल्पांमध्ये आहे.जिल्ह्यातील एकूण ५0 प्रकल्प ह्यओव्हर फ्लोह्ण झाले असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील १८, मानोरा १३, मालेगाव आठ, कारंजा सहा, मंगरुळपीर चार आणि रिसोड तालुक्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे.