लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता वितरण व्यवस्थेची क्षमता वाढविणे आणि त्या अनुषंगाने अतिभारीत होणाºया उपकेंद्राचा भार कमी करणे याकरीता ९५ कोटी रुपये मंजूर आहेत. यामधून ९ नवीन उपकेंद्रे, १९०० नवीन रोहित्र उभारली जाणार आहेत. आतापर्यंत केवळ तीन उपकेंद्रे आणि ५० विद्युत रोहित्रांची कामे पूर्ण झाली असून, प्रशासकीय यंत्रणेची ही दिरंगाई शेतकºयांसाठी गैरसोयीची ठरत आहे.जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदी परिसरातील हजारो शेतकºयांच्या शेतीला सिंचनाची जोड म्हणून जलसंपदा विभागाच्यावतीने ११ बॅरेजेस उभारण्यात आले. यासाठी तब्बल ७०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक निधी खर्ची पडला. बॅरेजेसची कामेही विहित मुदतीत पूर्ण न झाल्याने अंदाजपत्रकीय किंमतीत भरमसाठ वाढ झाली. बॅरेजेसची कामे पूर्ण झाल्यानंतर उपसा सिंचनाकरीता विद्युत व्यवस्था उभारण्यासाठी साधारणत: सव्वा वर्षांपूर्वीच ९५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झालेला आहे. यापैकी २५ कोटी रुपये एप्रिल २०१८ या महिन्यात जलसंपदा विभागाकडून महावितरणाला प्राप्तही झालेले आहेत. या निधीतून नवीन ९ उपकेंद्रे, उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त तीन रोहित्र उभारणे, ३३ केव्हीची उच्च दाब वाहिणी १६५ किमी, ११ केव्ही उच्चदाब वाहिणी ३१० किमी, १९०० नवीन रोहित्रे आदी कामे केली जाणार आहेत. मात्र, या कामांची गती पाहता शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे. १९०० विद्युत रोहित्रांपैकी जवळपास १५० रोहित्रांची कामे सुरू असून, ५० कामे पूर्ण झाली आहेत. ९ नवीन उपकेंद्रांपैकी ३ उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे सुरू आहेत. विद्युतविषयक कामांची गती संथ असल्याने शेतकºयांना सिंंचन करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. बॅरेजेसमुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर आणि नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. अवैध पद्धतीने पाणी उपसा झाल्याने व अन्य कारणांमुळे राजगाव, टनका, जयपूर, अडगाव, गणेशपूर, कोकलगाव या बॅरेजमध्ये ठणठणाट आहे. यामुळे उन्हाळी पीक घेण्याचे शेतकºयांचे स्वप्न भंगले आहे तर उर्वरीत बॅरेजेसमध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने उन्हाळी पीक घेण्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता शेतकºयांमधून वर्तविली जात आहे.
पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता प्रस्तावित विद्युतविषयक कामे केली जात आहेत. आतापर्यंत नवीन तीन उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली तसेच १५० पेक्षा अधिक विद्युत रोहित्रांची कामे अंतिम टप्प्यात असून ५० कामे पूर्णही झाली आहेत.- व्ही.बी. बेथारिया, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम