रिसोड (वाशिम) - १४ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत रिसोड तालुक्यात एकूण ३५० कामांना मंजूरात मिळाली असून, यापैकी १९६ कामे अपूर्ण झाली आहेत तर १५४ कामे अपूर्ण असल्याची माहिती समोर आली.ग्रामपंचायतींचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी १४ व्या केंद्रीय वित्त आयोगातून लाखो रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या बँक खात्यावर दिला जातो. रिसोड तालुक्यात ८० ग्रामपंचायती असून, एकूण सात कोटी ८२ लाख ८८ हजार ५८० रुपयांतून ग्रामपंचायत स्तरावर ३५० कामे प्रस्तावित आहेत. यापैकी फेब्रुवारीअखेर १९६ कामे पूर्ण झाली आहेत तर १५४ कामे अपूर्ण आहेत. १९६ कामांवर एक कोटी ९८ लाख ६६ हजार ७३० रुपयांचा निधी खर्च झाला आहे. उर्वरीत १५४ कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना दिलेल्या आहेत.
३५० पैकी १५४ कामे अपूर्ण
By admin | Published: April 03, 2017 5:00 PM