लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात शिक्षण विभागाच्यावतीने आतापर्यंत ७७३ पैकी ४८३ शाळा प्रगत करण्यात आल्या असून, उर्वरीत २९० शाळा प्रगत करणे बाकी आहे.बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात शिक्षण विभागातर्फे कार्यवाही सुरू असून, आतापर्यंत ७७३ पैकी ४८३ शाळा प्रगत करण्यात यश मिळाले आहे. शाळा बोलक्या करण्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. मूलभूत क्षमतेत ७५ टक्के गुण व अभ्यासक्रमावर आधारीत ६० टक्के गुण घेणाºया विद्यार्थ्यास प्रगत समजले जाते. ६ ते १४ वयोगटातील बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती नाहीसी करणे, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शैक्षणिक साहित्यावर भर, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, विद्यार्थ्यांना कृतीद्वारा शिक्षण देणे, कठिण विषयाविषयी आवड निर्माण करणे, शाळा सुंदर करून विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहेत. या निकषांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रगत करण्यासाठी शिक्षकांना योग्य त्या सूचना दिल्या. केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहकार्यातून आतापर्यंत ४८३ शाळा प्रगत करण्यात यश मिळाले असून, उर्वरीत २९० शाळा प्रगत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी डी.ए. तुमराम यांनी सांगितले.
वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ पैकी ४८३ शाळा ‘प्रगत’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 2:03 PM
वाशिम : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात शिक्षण विभागाच्यावतीने आतापर्यंत ७७३ पैकी ४८३ शाळा प्रगत करण्यात आल्या असून, उर्वरीत २९० शाळा प्रगत करणे बाकी आहे.
ठळक मुद्दे प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. वाशिम जिल्ह्यात शिक्षण विभागातर्फे कार्यवाही सुरू असून, आतापर्यंत ७७३ पैकी ४८३ शाळा प्रगत करण्यात यश मिळाले आहे. उर्वरीत २९० शाळा प्रगत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी डी.ए. तुमराम यांनी सांगितले.