रिसाेड : शहरात गत दहा ते पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात डेंगू सदृश आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने परिसरात डेंग्यूची साथ आल्याचे दिसून येत आहे. आराेग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
शहरातील अनेक भागामध्ये या साथीचे थैमान दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. याबाबत प्रशासनाकडून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. रिसाेड नगर परिषदकडून यासाठी उपाययोजना करून डेंगू सदृश आजाराचे रुग्ण ज्या भागात आहेत त्या भागात डासांची वाढलेली उत्पत्ती कमी करण्यासाठी औषधयुक्त फवारणी करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये जवळपास ३० ते ४० लहान मुले सध्या या आजाराने ग्रस्त झाले असून याबाबत त्यांचे पालकसुद्धा भयभीत झाले आहेत. प्रशासनाच्यावतीने ठोस पावले उचलून संबंधित आजारावर नियंत्रण करणे गरजेचे असून नगरपालिका आरोग्य विभागाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी रिसोड शहरातील नागरिक करीत आहेत.