शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

ऑक्सिजन निर्मिती प्लांटच्या कामाला हवी गती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:37 AM

वाशिम : कोरोना विषाणू संसगार्चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात गत दीड महिन्यापासून ऑक्सिजन निर्मिती ...

वाशिम : कोरोना विषाणू संसगार्चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात गत दीड महिन्यापासून ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम सुरू आहे. अद्याप काम पूर्णत्वाकडे आले नसून, संभाव्य परिस्थिती लक्षात घेता या प्लांटच्या कामाला गती मिळणे गरजेचे ठरत आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गतवर्षी ३ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती. जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट नसल्याने अकोला व जालना येथील प्लांटमधून वाशिम जिल्ह्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर मागविण्यात येतात. ऑक्सिजनअभावी रुग्णांना गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून वाशिम येथेच ऑक्सिजन प्लांटची निर्मिती व्हावी असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून मध्यंतरी उमटला होता. ‘लोकमत’नेदेखील वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून आरोग्य यंत्रणेचे लक्ष वेधले होते. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात १३ केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावा, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १० ऑक्सिजन रोजी वाशिम येथे ‘आरटी-पीसीआर’ प्रयोगशाळेच्या ई-उद्‌घाटन कार्यक्रमप्रसंगी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या निधीमधून लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचालीही प्रशासनाने सुरू केल्या होत्या. मात्र, त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली आल्याने हा प्रश्न बाजूला पडला होता. गत दोन महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने वाशिम येथे ऑक्सिजन प्लांट असावा, ही मागणी पुढे आली. केंद्र सरकारने राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणीला मंजुरी दिली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात हा प्लांट उभारण्यात येणार असून, फेब्रुवारी महिन्यात प्राथमिक चाचपणी पूर्ण झाली होती. साधारणत: दीड महिन्यात प्लांटचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा असताना, दोन महिन्यांनंतरही प्लांटचे काम पूर्णत्वाकडे आले नाही. प्लांटचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता आरोग्य विभागाकडून संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू आहे. एप्रिलअखेर प्लांट पूर्णत्वाकडे येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

०००००

बॉक्स

परजिल्ह्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा

वाशिम येथे ऑक्सिजन प्लांट नसल्याने अकोला व जालना जिल्ह्यांतून वाशिमला ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आणि अकोला व जालना येथून होणाऱ्या पुरवठ्यात कपात झाली तर परिस्थिती बिकट होऊ शकते. ही शक्यता लक्षता घेता वाशिम येथील ऑक्सिजन निर्मिती प्लांट लवकरात लवकर साकारला जावा, अशी अपेक्षा जिल्हावासीयांमधून व्यक्त होत आहे.

०००

कोट

केंद्र सरकारच्या नावीन्यपूर्ण योजनेतून वाशिम येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांटला मंजुरी मिळालेली आहे. ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. हा प्लांट लवकरात लवकर पूर्ण व्हावा याकरिता संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. मधुकर राठोड

जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम