केंद्र सरकारच्या १६ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद होऊन त्याला उपचार उपलब्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे अशा रुग्णांची नोंद बंधनकारक करण्यात आली असून क्षयरुग्ण नोंदणीसाठी खासगी रुग्णालये, खासगी औषधी विक्रेते, प्रयोगशाळा यासारख्या संस्थांनी क्षयरुग्णांची विहित नमुन्यातील माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी, वाशिम यांच्याकडे प्रत्यक्ष किंवा ई-मेलवर दरमहा पाठविणे बंधनकारक आहे. खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थांनी क्षयरोग निदान करणाऱ्या जिल्ह्यातील पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा, रेडीओलॉजी सुविधा, क्षयरुग्णांवर उपचार करणारी विविध पॅथींची सर्व रुग्णालये, डॉक्टर (सर्व बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सुविधा) आणि क्षयरोगाची औषधी विकणारे सर्व औषधी विक्रेते यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे क्षयरुग्णांची नोंदणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
क्षयरुग्णांची नोंदणी करण्याची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:56 AM