वाशिम : केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानात जिल्हा परिषदेबरोबरच नगर पालिकांनीही उद्दिष्टपूर्तीसाठी जोरदार प्रयत्न चालविले होते, परंतु काही महिन्यांपासून शहरी भागातील अभियानाचा वेग मंदावला असून याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. शहरी भागांतील नागरिकांनी शौचालय बांधावे यासाठी नगर पालिका प्रशासन गत तीन चार महिन्याआधी वेगवेगळे उपक्रम राबवित आणि वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला शौचालय बांधण्यासाठी प्रेरित केले. देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे. या अभियानाला महाराष्ट्राने आणखी व्यापक स्वरुप देण्याचे ठरविले आहे. त्यातूनच आता राज्यातील नागरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यात येत आहे. येत्या पाच वर्षांत भारत हा स्वच्छ देश म्हणून ओळखला जावा, यासाठी केंद्राने राबविलेली योजना महत्त्वपूर्ण आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी राज्याचा हातभारही लागणे आवश्यक आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने नागरी भागातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले असतांना काही दिवस हे व्यवस्थित चालले परंतु नंतर या मोहीमेचा वेग पूर्णपणे मंदावल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्यावतिने पथके कार्यान्वित!४स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाच्यावतीने शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतिने वेगवेगळे पथक निर्माण करुन ते आजही फिरतांना दिसूनयेत आहेत. गुडमॉर्निंग पथकाच्यावतिने टमरेल जप्ती अभियानासह विविध उपक्रम राबवून पहाटेपासूनच गावागावात पथक ठिय्या मांडून बसलेले दिसून येत आहेत. यामुळे उघडयावर शौचास जाणाºयांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. अनेकांनी या भानगडीतून मुक्त होण्यासाठी शौचालयांचे कामे हाती घेतले असल्याचे जिल्हयात चित्र दिसून येत आहे.