००००
केनवड परिसरात इंटरनेटमध्ये व्यत्यय
वाशिम : गत काही दिवसांपासून इंटरनेट सेवेत वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. सोमवारीदेखील दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने आपले सरकार सेवा केंद्र, बँक व अन्य कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले.
००
माहिती भरताना अंगणवाडीसेविकांची दमछाक
वाशिम : अंगणवाडीसेविकांना पोषण आहाराची माहिती पोषण ट्रॅकर अॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, या अॅपमध्ये हिंदी व इंग्रजी भाषा असल्याने पोषण आहारची माहिती भरताना अंगणवाडीसेविकांची दमछाक होत आहे.
००
इंझोरी परिसरात उघड्यावर शौचवारी
वाशिम : ग्रामीण भागात शौचालय उभारण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी आजही नागरिक गावातील रस्त्याच्या दुतर्फा शौचास बसत असल्याचे चित्र इंझोरी परिसरात दिसून येते. यामुळे गाव पसिरात अस्वच्छतेचा वातावरण निर्माण होत आहे.
००००
धनज परिसरात कोरोनाबाधित नाही
वाशिम : धनज परिसरात सोमवारच्या अहवालानुसार एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने सोमवारी केले.
००००
उंबर्डा परिसरात आरोग्य तपासणी
वाशिम : उंबर्डा परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि हात वारंवार धुवावे , असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
०००००
दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाशिम : अनसिंग येथील बाजारपेठ सोमवारी पूर्वपदावर येत असतानाहीच काही दुकानांमध्ये गर्दी झाली. दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. कोरोनाचे गांभीर्य ओळखून नागरिक व दुकानदारांनी दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.
०००००
मालेगाव तालुक्यात १९ कोरोना रुग्ण
मालेगाव : मालेगाव तालुक्यात आणखी १९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. मालेगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.
००००
प्रकल्प दुरूस्तीसाठी निधीची प्रतीक्षा
वाशिम : वाशिम तालुक्यातील जवळपास ९ लघु प्रकल्पाच्या गेटची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रकल्पातून पाणी गळती होते. या प्रकल्प दुरूस्तीसाठी शासनाकडून अद्याप निधी मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाने निधी पुरवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी केली.
०००००००
मालेगाव शहरातील खड्डे बुजविण्याला खो
मालेगाव : मालेगाव शहरातील अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. शहरातील मुख्य रस्ता हा खड्डामय झाल्याने चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
०००००००
रस्त्याच्या कडा भरण्याची मागणी
वाशिम : तोंडगाव फाट्यावरून गावात येणाºया रस्त्याच्या कडा खचल्या आहेत. यामुळे दुचाकी वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या कडा भरण्यात याव्या, अशी मागणी गावकºयांनी सोमवारी केली.
०००००
रेतीची अव्वाच्या सव्वा दराने विक्री
वाशिम : रेतीघाट लिलाव न झाल्याने जिल्ह्यात रेती उपलब्ध नाही. घर बांधकाम करणाऱ्यांना अव्वाच्या सव्वा दराने रेती विकत घ्यावी लागत आहे. प्रती ब्रास ६ ते ८ हजार रुपये मोजावे लागत आहेत.