शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

पंचायत समिती घेणार घरकुल योजनेचा आढावा !

By admin | Published: May 19, 2017 7:25 PM

रिसोड : घरकुलाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना अनुदानाचा लाभ मिळाला की नाही यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी रिसोड पंचायत समितीच्यावतीने ग्रामसेवकांचा आढावा घेतला जाणार आहे.

ऑनलाइन लोकमतरिसोड - प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा आवास योजना, रमाई व शबरी आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना अनुदानाचा लाभ मिळाला की नाही यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी रिसोड पंचायत समितीच्यावतीने संपूर्ण तालुक्यातील ग्रामसेवकांचा आढावा २५ मे रोजी पंचायत समितीच्या सभागृहात घेतला जाणार आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय तसेच दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबाना राहण्यासाठी निवारा नाही. अशा बेघर कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य शासनाने घरकुल योजना अंमलात आणली आहे. दारिद्ररेषा यादीतील गुणांकानुसार लाभार्थी निवडीची प्रक्रिया राबविली जाते. राहायला घर नाही, बांधायला पैसा नाही, अशा बेघर व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थीला या योजनेत प्राधान्यक्रम दिला जातो. रिसोड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा आवास योजना, रमाई व शबरी आवास योजनेंतर्गत शेकडो लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्यात आला. मात्र, अद्याप काही लाभार्थींना अनुदानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचा निधी मिळाला नसल्याच्या तक्रारी पंचायत समितीला प्राप्त झाल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने सभापती छाया पाटील व उपसभापती महादेव ठाकरे यांनी घरकुलसंदर्भात आढावा सभा बोलाविण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना केल्या होत्या. यानुसार तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून घरकुलासंबंधीची संपूर्ण माहिती बोलाविली असून, २५ मे रोजी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा घेतला जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर मंजूर घरकुल लाभार्थींची यादी, पंचायत समितीला घरकुल प्रस्ताव कधी सादर झाला, लाभार्थीला आतापर्यंत मिळालेले अनुदानाचे हप्ते, प्रलंबित हप्ते आणि घरकुलाची आजची स्थिती अशी माहिती बोलाविल्याने घरकुलाच्या प्रलंबित अनुदानाचा तिढा सुटणार असल्याची अपेक्षा लाभार्थींमधून व्यक्त होत आहे. घरकुल अनुदान वितरणात प्रचंड दिरंगाई करणाऱ्यांविरूद्ध कारवाईदेखील प्रस्तावित केली जाणार असल्याची माहिती आहे.