राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा आणि प्रॅक्टिकल पुढच्या महिन्यांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने आढावा घेतला. त्यावेळेस ऑनलाईन परीक्षा घेऊ शकतो का, यावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान बोर्डाने परीक्षा घेण्यासाठी आपण पूर्णपणे तयार झाल्याचे स्पष्ट केले; परंतु ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या असल्याने आॅनलाईन परीक्षा घेतल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळे दहावी, बारावीची परीक्षा ही ऑफलाईनच होणार आणि परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागण्याची शक्यता असल्याने दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
----
बॉक्स
दहावीतील विद्यार्थ्यांचे पालक
कोट: जिल्ह्यात आठवडाभरातच ५०० लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली. अशात शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा केंद्रावर घेतल्यास केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढीस वाव मिळणार आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने पर्यायी उपायांचा विचार करावा.
-सारिका पवार,
पालक, मंगरुळपीर
-------
कोट: केंद्रावर होणाऱ्या गर्दीतून विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. सुविधा कितीही असल्या तरी त्यामुळे आमचा पाल्य सुरक्षित राहीलच याची खात्री मुळीच नसल्याने आमची चिंता वाढली आहे.
-संतोष लांडगे
पालक, वाशिम
कोट: एकिकडे वाढत्या कोरोनामुळे सकाळी ९ ते ५ पर्यंतच व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू ठेवली जात आहेत. परीक्षेला, तर हजारो विद्यार्थी बसणार आहेत. ते केंद्रावर येताच गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढीस मदत होणार नाही का, असा आमचा प्रश्न आहे.
-अजय जयस्वाल,
पालक इंझोरी,
-------------
बारावीतील विद्यार्थ्यांचे पालक
कोट: जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने जमावबंदीचे आदेश असताना बारावीच्या शालांत परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणे मुळीच योग्य नाही. यातून कोरोना संसर्गाची भीती असल्याने आमच्या मनात पाल्याच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे.
कमला महादेव लांडकर,
महिला पालक, वाशिम
------
कोट: वाढत्या कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणावर शासनाने भर दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरच कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका नाही का.
-तुकाराम जाधव,
पालक, वाशिम
--------
कोट: कोरोना वाढत असल्याने प्रशासनाने जमावबंदीचे आदेश दिले. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी लावून लग्नातही २५ व्यक्तींनाच सहभागी होण्याची परवानगी दिली. परीक्षेच्या वेळी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना वाढणार नाही का, ही चिंता आम्हाला सतावत आहे.
कोट: पांडुरंग मुठाळ,
पालक वाशिम
एकूण विद्यार्थी
८५०००
बारावीचे विद्यार्थी
३४०००
दहावीचे विद्यार्थी
५१०००