वाशिम: जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कामानिमित्त येणारे नागरिक वाहने उभी करीत असल्याने इतरांना त्रास सोसावा लागतो. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने ५ डिसेंबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची तत्काळ दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने आज ह्यपार्किंंंग झोनह्णमध्ये उभ्या केल्या जाणार्या वाहनांची हवा ह्यगूलह्ण केली. जिल्ह्याचे ह्यमिनी मंत्रालयह्ण म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त येणार्या नागरिकांची दैनंदिन वर्दळ असते. नागरिकांच्या वाहनांकरिता कार्यालयीन परिसरात स्वतंत्र ह्यपार्किंंंगह्ण स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे; मात्र ठराविक ठिकाणी वाहने उभी न करता कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच वाहने उभी केली जात असल्याने ये-जा करणार्या नागरिकांना त्याचा त्रास सोसावा लागतो. याठिकाणी लावण्यात आलेले ह्यवाहन प्रवेश निषेधह्णचे फलकही उचलून ठेवल्या जाते. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने ५ डिसेंबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची तडकाफडकी दखल झाली असून, शनिवारी दिवसभर दोन परिचर जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर उभे करुन नागरिकांना ह्यपार्किंंंग झोनह्णची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यासह काही वाहनांच्या चाकातील हवा सोडून देण्यात आली. या कारवाईमुळे शनिवारी कार्यालयाचा दर्शनी भाग मोकळा झाल्याचे दिसून आले.
‘पार्किंंग झोन’मधील वाहनांची हवा केली ‘गूल’!
By admin | Published: December 06, 2015 2:21 AM