कार्यक्रमाचे उद्धाटन जि. प. चंद्रकांत ठाकरे यांचे हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य मयुरी चंद्रकांत पाकधने होत्या प्रमुख पाहुणे म्हणून राकाँचे ज्येष्ठ नेते गुणवंतराव पाकधने, राकाँ तालुकाध्यक्ष आर. के. राठोड, माजी पं. स. सभापती भास्कर पाटील शेगीकर, सरपंच संघटना वाशिम जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत गुणवंतराव पाकधने, पं.स. सदस्य मीना सचिन राऊत, पं. स. सदस्य शेख आरिफाबी, गोपाल सावके, देवलाल ठाकरे, अविनाश सावके, नितीन सावके, गजानन दहातोंडे, आदि मान्यवर उपस्थित होते. पारवा सर्कलमध्ये अल्पकालावधीत ६१० लक्ष रुपयांची विकासकामे होत असून, या सर्कलचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भविष्यात मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे आश्वासन यावेळी जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले. मंगळसा, वाढा, मूर्तिजापूर, झाडगाव, बेलखेड, पोटी, मोहरी, खडी, एखांबा, शिवणी रोड, पोघात, गणेशपुर, मसोला बु., पिंपळखुटा, या गावात कोरोना नियमाचे पालन करून कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सरपंच,उपसरपंच, सचिव, तसेच मंगळसा, वाढा, मूर्तिजापूर, झाडगाव, बेलखेड, पोटी, मोहरी, खडी, एखांबा, शिवणी रोड, पोघात, गणेशपूर, मसोला,बु. पिपलखुटा, या गावातील गावकरी उपस्थित होते.
पारवा जि.प. सर्कलमध्ये भूमिपूजन, लोकार्पण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:41 AM