लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : पर्यूषण पर्व निमित्त शिरपूरनगरीत विविध कार्यक्रम राबविण्यात आले असून, समाप्तीनंतर ३० सप्टेंबर रोजी दिगंबर जैन समाजबांधवांच्यावतीने गावातून मिरवणूक काढण्यात आली. १४ सप्टेंबरपासून येथील दिगंबर जैन संस्थानमध्ये पर्यूषण पर्वनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भाविकांनी उपवासही केले होते. पर्यूषण पर्वाच्या समाप्तीनंतर ३० सप्टेंबर रोजी दिगंबर संस्थान येथून पार्श्वनाथ भगवान यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. शाळकरी मुलींनी लेझिम पथकाद्वारे विविध कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीदरम्यान विविध भक्तीगितांवर भाविकांनी नृत्य सादर केले. ऐतिहासिक पवळी मंदिरात येऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिगंबर जैन बांधवांनी परिश्रम घेतले.
पर्यूषण पर्व : मिरवणुकीने शिरपूरनगरी दुमदुमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:35 PM
शिरपूर जैन (वाशिम) : पर्यूषण पर्व निमित्त शिरपूरनगरीत विविध कार्यक्रम राबविण्यात आले असून, समाप्तीनंतर ३० सप्टेंबर रोजी दिगंबर जैन समाजबांधवांच्यावतीने गावातून मिरवणूक काढण्यात आली.
ठळक मुद्दे१४ सप्टेंबरपासून येथील दिगंबर जैन संस्थानमध्ये पर्यूषण पर्वनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ३० सप्टेंबर रोजी दिगंबर संस्थान येथून पार्श्वनाथ भगवान यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.ऐतिहासिक पवळी मंदिरात येऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आला.