कोरोना विषाणू संसर्गाने फेब्रुवारी-मार्च २०२० महिन्यापासून अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या संसर्गाचे प्रमाण जिल्ह्यातही झपाट्याने वाढले. कोरोनाबाधित व्यक्तीच्या खोकल्यातून, शिंकण्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे निदान झाल्यानंतर नागरिकांनी ठरावीक शारीरिक अंतर राखण्यासोबतच प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात बंद असलेला एस.टी.चा प्रवास पूर्ववत झाल्यानंतर तोंडाला मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही एस.टी.त प्रवेश देऊ नये, असा नियम करण्यात आला. त्याअनुषंगाने एस.टी.वर ‘नो मास्क, नो प्रवास’ असे लिहून असलेले भलेमोठे फलक दोन्हीकडून लावण्यात आलेले आहेत. असे असले तरी निष्काळजीपणा अंगीकारलेले अनेक नागरिक तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून आले.
................
बॉक्स
प्रवाशांची बेफिकिरी
औरंगाबाद आगाराची एम.एच. १४ बी.टी. १९८५ या क्रमांकाची एस.टी. बस १४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वाशिम आगारात दाखल झाली. या एस.टी.वर दोन्हीकडून ‘नो मास्क, नो प्रवास’चे फलक होते; मात्र एस.टी.तून उतरणा-या आणि चढणा-या अनेक प्रवाशांच्या तोंडाला मास्क नसल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले.