लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे मंगरुळपीर शहरात अपघाताची मोठी अपघाताची निर्माण झाली आहे. अतिक्रमणामुळे वाहने अगदी रस्त्यालगतच आणि वाटेल तशी उभी करण्यात येत असल्याने पायवाट काढणेही नागरिकांना कठीण होत आहे.मंगरुळपीर शहरांत अकोला चौक, मानोरा चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ही महत्त्वाची आणि मोठ्या वर्दळीची ठिकाणी झाली आहेत. अकोला चौक हा शहरातील मुख्य चौक असून, येथूनचअमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिमकडे मार्ग जातात. त्यामुळे दरदिवशी शेकडो वाहनांची वर्दळ येथे सुरू असते. साहजकिच प्रवाशांची संख्याही येथे असते. त्याशिवाय या चौकांत उपाहारगृहे, खाणावळी असून, फळविके्रते, पानटपºया आदिंची गर्दी असतानाच या चौकांत चहुकडे वाहने अस्ताव्यस्त उभी ठेवण्यात येतात. मानोरा चौक, बसस्थानक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचीही हीच स्थिती आहे. त्यात मानोरा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान शहरातील सर्वच महत्त्वाची कार्यालये आहेत. यामध्ये पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, विश्रामगृह, भूमीअभिलेख कार्यालय, विश्रामगृह आणि पंचायत समितीचा समावेश आहे. त्यामुळे येथे ग्रामीण भागांतून दरदिवसाला हजारावर लोक विविध कामासाठी येत असतात. या दोन्ही चौकादरम्यान रस्त्यावर विविध दुकाने थाटण्यात आली आहेत. रस्ता अरूंद असल्याने येथे वाहनांची वर्दळ वाढते आणि शहरातील जनतेसह ग्रामीण भागांतून येणाºया लोकांना त्याचा मोठा त्रास होतो. त्यातच बाबासाहेब आंबेडकर चौकातून वाशिम, अमरावती, अकोलाकडे जाणाºया वाहनांची संख्या मोठी असते आणि याच चौकातून शहरात जाणारा एक मुख्य रस्ताही आहे. वाशिम-अमरावती मार्गावर धावणारी वाहने शहरातून येणाºया वाहनधारकाला अगदी चौकात येईपर्यंतही दिसत नाहीत. अशात भरधाव येणाºया वाहनांमुळे अपघाताची भिती आहे. याची दखल घेऊन तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासनाने वाहनधारकांना शिस्त लावण्यासह बेकायदा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
मंगरुळपीर शहरात बेशिस्त वाहतुकीचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 4:45 PM
मंगरुळपीर: बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे मंगरुळपीर शहरात अपघाताची मोठी अपघाताची निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देअकोला चौक, मानोरा चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ही महत्त्वाची आणि मोठ्या वर्दळीची ठिकाणी झाली आहेत.अतिक्रमणामुळे वाहने अगदी रस्त्यालगतच आणि वाटेल तशी उभी करण्यात येत असल्याने पायवाट काढणेही नागरिकांना कठीण होत आहे.