जिल्ह्यात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत असून, १ एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये १६३९८ काेराेना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये १ एप्रिल या एका दिवशी चक्क ३२३ जणांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, नगरपरिषदेतर्फे मुख्याधिकारी दीपक माेरे यांच्या मार्गदर्शनात तर शहर वाहतूक शाखेतर्फे शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नागेश माेहाेड यांच्या मार्गदर्शनात दरराेज शेकडाे व्यावसायिक, नागरिक, दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. लघू व्यावसायिकांनाही काेराेना नियमांचे पालन करण्याचे सूचित करण्यात येत आहेत. तरीही काही लघू व्यावसायिक चक्क रस्त्यावर आपला व्यवसाय थाटून वाहतूक प्रभावित करणे, गर्दी हाेईल असे कृत्य करीत असल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. याबाबत संबंधितांनी लक्ष देऊन गर्दी टाळण्यासाठी कठाेर पावले उचलण्याची मागणी नागरिकांतून जाेर धरत आहे.
---------------
पथक आले की, लघू व्यावसायिकांची धावपळ
शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर, तसेच रस्त्यावर वाहने उभी करून वाहतूक प्रभावित करणाऱ्यांवर नगरपरिषद व शहर वाहतूक शाखेतर्फे कारवई करण्यात येत आहे. या दाेन्ही विभागांचे पथक आले की, लघू व्यावसायिक धावपळ करून काही वेळापर्यंत तेथून निधून जातात, नंतर परिस्थिती जैसे थे दिसून येते.
------------
रस्त्यावर गर्दी करणे, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना नियुक्त करण्यात आलेल्या पथकांना देण्यात आल्या आहेत.
- दीपक माेरे,
मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम
-------------
रस्त्यावर उभे राहून वाहतूक प्रभावित करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अधिक गतिमान करण्याचे नियाेजन केेले आहे.
- नागेश माेहाेड,
शहर वाहतूक शाख निरीक्षक, वाशिम