ठळक मुद्देगुडमॉर्निंग पथकाची कारवाई२५ व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पेन : परिसरात दररोज सकाळी गुडमॉर्निग पथक गावात येवून उघडयावर शौचास जाणा-यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. १८ सप्टेंबर रोजी २५ व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.आसेगाव पेन परिसरातील रिठद, देउळगाव बंडा, बेलखेडा, पार्डी तिखे, येवता या सहा गावांमध्ये सकाळी ५.३० ते ८ वाजताच्या दरम्यान गुडमॉर्निग पथकाने भेट देवून २५ जणांवर कारवाई केली. तसेच गुडमॉर्निग पथकाच्यावतिने उघडयावर जावू नका, घरोघरी शौचालय बांधा अशा सूचना देत उघडयावरील हागणदारीमुळे होणाºया आजाराबाबत, दुष्परिणामाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.