वाशिम : राष्ट्रीय लोकअदालतमधून विविध प्रकारच्या प्रलंबित १२ प्रकरणांचा सामोपचारातून निपटारा करण्यात आला आहे. वाशिम तालुका विधी सेवा समितीतर्फे ११ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीत राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश ए.आर. सिकची यांनी दीपप्रज्वलनाने केले. यावेळी वरिष्ठ स्तर न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एस.आर. जैस्वाल, मुख्य न्यायदंडाधिकारी एस.के. चौदंते, वरिष्ठ स्तरसह दिवाणी न्यायाधीश एस.पी. देशमुख, जिल्हा कोषागार अधिकारी प्रकाश राठोड, अँड. सोमाणी आदींची उपस्थिती होती. प्रलंबित प्रकरणे कमी संख्येत असल्याने या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एक पॅनल होते. या पॅनल नंबर एकवर कनिष्ठ स्तर वाशिमचे सह दिवाणी न्यायाधीश बी.डी.गोरे, वकील संघाचे अँड.एस.के. पठाडे, सामाजिक कार्यकर्ते भगवान बोरचाटे गुरुजी यांनी कामकाज पाहिले. यावेळी एकूण १२ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला.
प्रलंबित १२ प्रकरणांचा निपटारा
By admin | Published: July 13, 2015 2:10 AM