शहराच्या शेवटच्या टाेकावर असलेल्या या वसाहतीकडे नगर परिषदेसह संबंधितांचे दुर्लक्ष दिसून होत आहे. ही वसाहत निर्माण केली असताना तेव्हा रस्त्यावर माती टाकून लेआउट केल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर माेठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी यापूर्वी स्वखर्चातून मुरूम टाकून पर्यायी व्यवस्था केल्याची माहिती आहे; परंतु पुन्हा रस्ता ‘जैसे थे’ झाल्याने दुचाकी घसरून अपघात हाेण्याच्या घटनांत माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्यावर मुरूम टाकून नागरिकांची गैरसाेय दूर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
............
रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने अपघातात वाढ
बिलालनगरमध्ये असलेल्या अंतर्गत रस्त्याने रात्री येणाऱ्या नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांच्या खाेलीचा अंदाज येत नसल्याने अनेक नागरिकांची माेटारसायकल घसरून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये संबंधितांविरुद्ध राेष व्यक्त केला जात आहे.