मानोरा तालुक्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित झपाट्याने वाढत आहेत, तरीही २४ मार्च बुधवारी आठवडी बाजारात मोठी गर्दी झाली होती. लोकांनी मास्क लावले नाही व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनाला खाे दिला. याकडे मात्र नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष नाही. शहरात गेल्या काही दिवसांपासून शेकडो कोरोना पाॅझिटिव्ह निघत असताना कोरोनाबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती हाेताना दिसून येत नाही .अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाही, नागरिक कामानिमित्त कार्यालयात येतात, मात्र कार्यालयात कर्मचारी दिसत नाही. गावात स्वछता नाही, नाल्या तुंबल्या आहेत. लोकांना घरकुलकरिता मार्गदर्शन नाही, त्यातच कोरोना काळात कोणत्याही उपाययोजना नाही. यामुळे शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांत केली जात आहे.
मानाेरावासी ठरताहेत काेराेनाचे वाहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:41 AM