सध्याचे खासगी ऑटो, जीप,लक्झरी, पेट्रोल , डिझेलचे वाढते भाव विचारात घेता या वाहनांतून प्रवास करताना होणारी प्रवाशांची लूट बघता नागरिकांसमोर मोठा प्रश्न पडला आहे. तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना बाजारपेठ, शिक्षण, रुग्णालय, दवाखाने तर कधी शैक्षणिक व खासगी कामानिमित्त तहसील आदी ठिकाणी जावे लागते.हा कित्येक किलोमीटरचा प्रवास ऑटोने करायचे म्हटल्यावर जास्त पैसे व मोजके प्रवासी असे असते.त्यामुळे गावातील लोकांची एकप्रकारे तारांबळ उडते. यामध्ये कुठे कुठे ही बससेवा सुरू झाली असून मात्र अपूर्ण व मोजक्याच फेऱ्याअभावी प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनानेसुद्धा ग्रामीण भागातील समस्यांकडे गांभीर्याने विचार करण्याची गरज असून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला उपाय शोधून योग्य ती अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागात जनतेला बससेवा सुरू होण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:43 AM