लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दिवाळीनंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. परंतु विविध क्षेत्रातील मान्यवरांशी , संघटनेशी चर्चा केली असता आता पुन्हा लाॅकडाऊन नकाेरे बाबा.. अशी प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे. आधिच लाॅकडाऊनकाळात माेठे नुकसान झाले आता पुन्हा नकाे, यापेक्षा नागरिकांनी खबरदारी घ्यावी , वाटल्यास आणखी नियम कडक करावे पण लाॅकडाऊन नकाे असे नागरिकांचे मत आहे.लाॅकडाऊन काळात माेठया प्रमाणात उदयाेग व्यवसाय ठप्प पडले, पयार्यी मजुरांवरही उपासमार आली. शासनाने लाॅकडाऊन उठविल्यानंतर व्यवसाय सुरु झालेत, अघापही पूर्णपणे व्यवसाय सुरळीत झाले नसले तरी हळूहळू व्यवस्थित हाेत आहेत. लाॅकडाऊन हटविण्यास काहीच काळ झाला नाही, आणि पुन्हा लाॅकडाऊन केल्यास अनेक व्यवसायाचे नुकसान हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसाआधी जिल्हयातील अनेक कामगार, मजूर, विविध कंपन्यांमध्ये काम करणारे आपआपल्या कार्यक्षेत्रात गेलेत. त्यांना पुन्हा परतावे लागेल.
लाॅकडाऊनमुळे आधिच चरितार्थ चालविणे कठीण झाले हाेते. आता कसेबसे ऑटाेरिक्षा काही अटी शर्तींवर सुरु आहेत. लाॅकडाऊन न करता नियमांचे सर्वांना पालन करणे बंधनकारक करावे.- वसीम सय्यदऑटाे संघटना
लाॅकडाऊमुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले. आताही व्यवसाय पाहिजे त्या प्रमाणात सुरळीत झाले नाहीत. परंतु हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. त्यात पुन्हा लाॅकडाऊन लागल्यास व्यापाऱ्याचे माेठे नुकसान हाेईल.- गाेविंद वर्मा, युवा व्यापारी संघटना
लाॅकडाऊन केल्यापेक्षा नियम कडक करुन लाॅकडाऊन हाेण्यापासून टाळावे. नागरिकांनीही शासनाच्या, प्रशासन नियमांचे पालन करुन काेराेना संसर्ग राेखण्यास प्रयत्न करावा , परंतु पुन्हा लाॅकडाउन नकाे. - जुगलकिशाेर काेठारी, व्यापारी संघटना
शासनाच्यावतिने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार काय करावयास पाहिजे व काय करु नये याबाबत नागरिकांना अवगत केल्या जात आहे. ३१ डिसेंबरपर्यंत काही नियमांचे पालन करण्याच्या सूचना जनतेला दिल्याच आहेत. यापुढेही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हाेईल. -षण्मुगराजन एस. जिल्हाधिकारी