- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यासंदर्भात इतरांना उपदेश करणाऱ्या आरोग्य विभागांतर्गतच्या सरकारी रुग्णालयांमध्येच ‘फिजिकल डिस्टन्सिंग’च्या नियमाचे पालन होत नसल्याचे ६ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दिसून आले. परराज्यात परतण्याच्या प्रयत्नात असणारे शेकडो कामगार, मजूर हे फिटनेस प्रमाणपत्रासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी करीत असल्याने जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या यशस्वी नियोजनामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये असून, यापुढेही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. दुसरीकडे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातच व्यवस्थित नियोजन नसल्याचा प्रकार ६ मे रोजी निदर्शनात आला. विविध आजारांच्या तपासणीसाठी येणारे सर्वसाधारण रुग्ण तसेच परराज्यात परतण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्रासाठी येणारे कामगार, मजूर हे जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी करीत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी नियोजन करणे आवश्यक ठरत आहे.परराज्यातील कामगार, मजुरांची गर्दी !परराज्यात परत जाण्यासाठी संबंधित मजूर, कामगारांना फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. सदर प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था एकमेव जिल्हा सामान्य रुग्णालयात आहे. त्यामुळे येथे प्रमाणपत्र घेण्यासाठी परराज्यातील मजूर, कामगारांची एकच गर्दी होत आहे. विशेष म्हणजे येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन होत नसल्याचा प्रकार ६ मे रोजी निदर्शनात आला.रुग्ण नोंदणीसाठीही गर्दीजिल्हा सामान्य रुग्णालयात सर्दी, खोकला व अन्य आजार असलेले रुग्णही तपासणीसाठी येतात. रुग्ण नोंदणी कक्षासमोर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगवून तेथे संबंधित रुग्णांना उभे राहण्यासंदर्भात नियोजन असणे अपेक्षीत आहे. परंतू, तशी व्यवस्था नसल्याचे रुग्णांची गर्दी होत आहे.
परराज्यातील मजूर, कामगारांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. सदर प्रमाणपत्र घेण्यासाठी मजूर, कामगारांची येथे गर्दी होत आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे म्हणून नियोजन करण्यात आले. संबंधितांना सूचनाही दिल्या. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची व्यवस्था केली जाईल.- डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम.