- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहामध्ये पालकमंत्री शंभुराज देसाई यांची पत्रकार परिषद २९ जून रोजी दुपारी १ वाजता घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेच पालन करण्यात आल्याचे दिसून आले नाही. विशेष म्हणजे प्रत्येक पत्रकार परिषदेच्यावेळी येणाऱ्या पत्रकारांचे सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्या जातात यावेळी त्याचाही विसर प्रशासनाला पडल्याचे दिसून आले.पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये कोरोनासंदर्भात सद्यस्थिती , उपाययोजना संदर्भात प्रशासनाकडून आढावा घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच खरिपाच्या पेरणीसंदर्भात, पोहरादेवी विकास आराखडाबाबतचा आढावा, बियाणे न उगविल्याबाबत, पीक कर्जासंदर्भात, हेल्पलाईन शुभारंभासंदर्भात , आरोग्य विभागातील कर्मचारी , औषधसाठा संदर्भात आढावा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांना कोरोनाच्या पृष्ठभूमिवर आपण जिल्हयात आले नाही व जिल्हयातील नागरिकांचे भ्रमणध्वनी उचलले नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर त्यांनी माझ्या गावाहून येतांना सहा जिल्हे पार करुन यावे लागते. त्याकरिता सहा जिल्हयांची परवानगी घ्या आणि मधात मला काही झाले तर काय. माझ्यामुळे जिल्हावासिय अडचणीत येवू नये म्हणून मी आलो नाही. परंतु ४ ते ५ मिटींग मी व्हीसीव्दारे घेतल्या आहेत. तसेच नागरिकांचे भ्रमणध्वनी सुध्दा घेतले आहेत.एखादयावेळी घेणे शक्य झाले नसावे असे मला वाटते. शेवटी मी पण माणूस आहे चुका होणारच असल्याचे सांगितले.पत्रकार परिषदेमध्येच शासनाच्या विविध योजनांच्या पुस्तिकेचे, फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांव्यतिरिक्त आवश्यकता नसलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमुळे सभागृहात एकच गर्दी झाली होती. जवळ जवळ असलेल्या खुर्च्यांवर सर्वजण बसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झालेले दिसून आले नाही. सभागृहात अतिरिक्त लावण्यात आलेल्या खुर्च्यांवरही अधिकारी कर्मचारी बसलेले होते. प्रशासनाकडूनच नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात असतांना त्यांच्याकडूनच पालन न झाल्याचे पत्रकार परिषदेत कुजबूज दिसून आली.लोकप्रतिनिधींसह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थितीपत्रकार परिषदमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह काही महत्वाचे अधिकारी वगळता ईतरही अधिकारी आणि कर्मचाºयांनी नाहक उपस्थिती लावली असल्याने सभागृहात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी यांचीही उपस्थिती दिसून आली.
जिल्हावासी माझ्यामुळे अडचणीत येवू नये म्हणून आलो नाहीकोरोनाचे संकट जिल्हयात आल्यानंतर प्रथमच जिल्हयात आगमन झालेल्या पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी साताºयाहून येताना सहा जिल्हे पार करतांना मलाच काही व्हावे व नंतर मी जिल्हयात यावे. यामुळे जिल्हावासिय अडचणीत येतील म्हणून मी आलो नसल्याचे सांगितले. परंतु मी येवू शकलो नाही तरी प्रशासनाच्या संपर्कात मात्र नियमित होतो.