लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव - शासनाच्या शारीरिक शिक्षक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मालेगाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेने शालेय क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ३ आॅगस्ट रोजी स्थानिक ना.ना.मुंदडा विद्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीनंतर मालेगावचे तहसीलदार राजेश वझिरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, शासनाने यापूर्वी ५ जानेवारी २००५ च्या शासन निर्णयात २५० विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक याप्रमाणे पद संख्या मंजूर केली होती. परंतू, आता शासनाने शारीरिक शिक्षकांच्या तासिका कमी केल्याने हे पद अतिरिक्त ठरण्याची भीती वर्तविण्यात आली . शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ तालुक्यातील सर्व शारीरिक शिक्षण शिक्षक हे क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात येणाºया स्पर्धेत सहभागी न होण्याच्या दृष्टीने सन २०१७-१८ मध्ये होणाºया शालेय क्रिडा स्पर्धेच्या आयोजनांवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदनात म्हटले.निवेदनावर राज ठाकरे, सुमेघ तायडे, संतोष राठोड, आर. के. चौधरी, व्ही. वाय. शिंदे, जी. के. भिसडे, संजय पिदडी, रमेश कुटे, राजेश्वर गायकवाड, अनंत देशमुख, सेवाराम चव्हाण, दी.रा. राठोड, एच. जे. बिडवई, एम.बी. अढागले, नितीन देशमुख, गजानन वाझुळकर, एम.टी. महल्ले, अश्विनी बैस, संध्या उंबरकर. व्ही.डी. खराटे, एस.पी. घुगे यांच्या स्वाक्षरी आहेत.
शारीरिक शिक्षक संघटनेचा शालेय क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 8:07 PM
मालेगाव - शासनाच्या शारीरिक शिक्षक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मालेगाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेने शालेय क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ३ आॅगस्ट रोजी स्थानिक ना.ना.मुंदडा विद्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
ठळक मुद्देशिक्षक विरोधी धोरणाचा निषेधमुंदडा महाविद्यालयकात पार पडलेल्या बैठकीत झाला निर्णयबैठकीनंतर शिक्षकांनी मालेगाव तहसीलदारांना दिले निवेदन