चिखलागड, वार्डा, खेर्डा, गिर्डा व खापरदरी या पाच गावांना व मंगरुळपीर, मानोरा या दोन शहरांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठ्या स्वरूपातील खड्डे पडले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून ते वाहनचालकांच्या अंगावर उडत असल्याने ते त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागातील रस्ते दुुरुस्तीचे काम जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व राज्य शासनाकडून होत असताना चिखलागड फाट्यावरून पाच गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे रुपडे कधी पालटणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
...................
कोट :
मानोरा तालुक्यातील पाच गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्याची आजमितीस मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. या समस्येकडे लक्ष पुरवून संबंधित यंत्रणेने रस्ता दुुरुस्तीचे काम विनाविलंब हाती घ्यावे, अशी अपेक्षा आहे.
- जानकीराम राठोड
सामाजिक कार्यकर्ते, खापरदरी