: मानोरा येथे रायूकॉंची बैठक
मानोरा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेतकरी, मजूर, सामान्य माणूस व युवकांना मोठे स्थान आहे. त्यामुळे युवकांनी पक्ष वाढविण्याकरिता प्रयत्न करावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी १४ सप्टेंबर रोजी मानोरा येथील ठाकरे पॅलेस येथे आयोजित वाशिंम जिल्हा रा. यू कॉं.च्या आढावा बैठकीत केले.
अध्यक्षस्थानी रा.कॉं. चे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, चंद्रकांत पाकधने, सुरेश गावंडे, यशवंतराव इंगळे, राम ठाकरे, प्रमोद चौधरी, आशिष पाटील, शेखर काटोले, भास्कर पाटील ,सचिन रोकड़े, गोपाल भोयर, सुनील जामदार,आर. के. राठोड,वाहिदोद्दिन शेख,दौलत इंगोले,मनोहर राऊत, संजय भुजाडे,बबलू शेख,अभजित पाटील,राम राठोड, गोविंदराव मातारमारे,सैजल देशमुख,सागर दुर्गे,सागर करड़े, अक्षय जगताप,अशोक मातारमारे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. चंद्रकांत ठाकरे म्हणाले की, आमच्याकडे आपल्या पक्षाचा आमदार नाही त्यामुळे विकास होत नाही. आपला आमदार व्ह्यावा याकरिता आपण कामाला लागले पाहिजे. मोदी सरकारमुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले याची जाण ओबीसीने ठेवावी. युवकांनी पक्ष संघटनेवर भर द्यावा व मेहनत करून पक्ष वाढवावा. असे आवाहन रविकांत वरपे यांनी केले.
राजू गुल्हाने, विनोद पट्टेबहादुर, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक कचरू झोंबाळे यांनी केले, संचालन गजानन आरु यांनी तर अनंता काळे यांनी आभार मानले. बैठकीला मोठ्या संखेने युवक उपस्थित होते.
बैठकीपूर्वी शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली.