मंगरुळपीर: वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या बोरव्हा येथील गावकऱ्यांनी १ मे रोजी श्रमदानातून एकाच दिवसात १८०४ घनमीटर क्षेत्राचा माती नाला बांध पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी महाश्रमदानाचाही आधार त्यांना होणार आहे मंगरुळपीर तालुक्यातील पारवा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरव्हा या गावाने पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेतंर्गत गावात ८ एप्रिलपासून नी श्रमदानास सुरूवात केली. प्रत्यक्षात ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजतानंतरच येथे श्रमदानाचा शुभारंभ झाला होता. तेव्हापासून गेली २२ दिवस येथील ग्रामस्थ श्रमदान करीत आहेत. श्रमदानातून जलसंधारणाची कामे जलदगतीने व्हावी म्हणून येथील गावकºयांनी मालेगाव तालुका कृषी अधिकारी आणि मूळ बोरव्हा येथील रहिवासी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनात १ मे रोजी श्रमदानातून एकाच दिवसात १८०४ घनमीटर क्षेत्राचा माती नाला बांध पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. या माती नाला बांधामुळे १८ लाख लीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. दरम्यान, बोरव्हा येथे केवळ ३६ कुटुंबांची वसती आणि १८१ लोकसंख्या असून, या गावाला वॉटर कप स्पर्धेत मानसी ६ घनमीटर म्हणजेच एकूण १०८५ घनमीटर क्षेत्र कामांचे लक्ष्य देण्यात आले आहे; परंतु येथील गावकऱ्यांनी २२ दिवसांच्या कालावधितच मानसी १८ घनमीटर क्षेत्राचे काम केले आहे. अर्थात निर्धारित उद्दिष्टापेक्षा तिप्पट काम केले आहे. गावकरी पाणीटंचाईला कायम हद्दपार करण्यासाठी झपाटले आहेत. त्यामुळेच कमी लोकसंख्या असतानाही येथे श्रमदानातून जलदगतीने जलसंधारणाची कामे होत आहेत. या गावातील १० व्यक्ती शासकीय सेवेत उच्च पदस्थ असून, ते सर्वही आपले गाव पाणीदार करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावत आहेत. त्यामुळेच येथील गावकऱ्यांनी १ मे रोजी दिवसभरातच १८०४ घनमीटर क्षेत्राचा आणि १८ लाख लीटर पाणी साठवण क्षमतेचा माती नाला बांध पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी प्रत्येक व्यक्ती झटणार असून, त्यांना महाश्रमदानात सहभागी व्यक्तींची मदत मिळू शकणार आहे.
बोरव्हावासियांचा एका दिवसांत मातीनाला बांध पूर्ण करण्याचा संकल्प; १८ लाख लीटर पाणीसाठा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 4:14 PM
मंगरुळपीर: वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या बोरव्हा येथील गावकऱ्यांनी १ मे रोजी श्रमदानातून एकाच दिवसात १८०४ घनमीटर क्षेत्राचा माती नाला बांध पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी महाश्रमदानाचाही आधार त्यांना होणार आहे मंगरुळपीर तालुक्यातील पारवा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरव्हा या गावाने पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेतंर्गत गावात ...
ठळक मुद्देबोरव्हा या गावाने पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. १ मे रोजी श्रमदानातून एकाच दिवसात १८०४ घनमीटर क्षेत्राचा माती नाला बांध पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. या माती नाला बांधामुळे १८ लाख लीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.