किन्हीराजा - गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत व ग्रामपंचायत मैराळडोह यांच्या माध्यमातून सोनाळा धरणातून सुमारे दोन लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्याचे नियोजन असून, ४ मशीन, ४० ट्रॅक्टरच्या साहाय्याने गाळ उपसा करण्यात येत आहे.
गाळ उपसा करण्यासाठी यंत्रसामग्री व त्याचा इंधन खर्च शासनामार्फत दिला जाणार आहे. मैराळडोहसह इतर आजूबाजूच्या गावांमधील शेतकरी या धरणातून गाळ उपसा करून आपल्या शेतामध्ये टाकत आहेत. सध्या याठिकाणी ४ मशीन व 40 ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ उपसा करण्यास सुरुवात झाली आहे. परिसरातील मैराळडोह, राजाकिन्ही, सोनाळा, एरंडा गावांतील जास्तीत जास्त शेतकºयांनी गाळ उपसा करण्यासाठी लोकसहभाग नोंदवावा, असे आवाहान मैराळडोहचे सरपंच राधाबाई बंडूराव घुगे यांनी केले. या धरणातील जास्तीत जास्त गाळ उपसा झाल्यास धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल तसेच शेतकºयांनादेखील जमिनीसाठी सुपीक गाळ उपलब्ध होईल. आगामी सिंचन व पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टिने या धरणातील गाळ उपसा करावा, असे आवाहन करण्यात आले.