शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तूर साठवणुकीसाठी नियोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 2:12 AM

वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत टोकनधारक शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात येत असलेली तूर साठविण्याची अडचण येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने वखार महामंडळाच्या सहकार्याने खासगी गोदामांचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एक लाख क्विंटल क्षमतेचे खासगी गोदाम भाड्याने घेण्यात आले असून,आणखी दीड लाख क्विंटल साठवण क्षमतेचे गोदाम भाड्याने घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 

ठळक मुद्देजिल्हा व्यवस्थापकांचे प्रयत्न भाडेतत्त्वावर एक लाख क्विंटल साठवण क्षमतेचे गोदाम ५0 हजार क्विंटल तुरीची मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या निर्देशानुसार बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत टोकनधारक शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात येत असलेली तूर साठविण्याची अडचण येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने वखार महामंडळाच्या सहकार्याने खासगी गोदामांचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एक लाख क्विंटल क्षमतेचे खासगी गोदाम भाड्याने घेण्यात आले असून,आणखी दीड लाख क्विंटल साठवण क्षमतेचे गोदाम भाड्याने घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. जिल्ह्यात गतव तुरीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन झाले. अशीच स्थिती राज्यभरात होती; परंतु शेतकर्‍यांना सुरुवातीला अपेक्षीत भाव मिळत नसल्याच्या तक्रारी होत असल्याने शासनाने फे ब्रुवारी २0१७ पासून  सुरुवातीला केंद्रशासनाच्या, तर त्यानंतर राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली. ३१ मे २0१७ पर्यंत चाललेल्या या खरेदीत वेळोवेळी विविध कारणांमुळे अडचणी आल्याने टोकन घेतलेल्या हजारो शेतकर्‍यांच्या तुरीची मोजणी होऊ शकली नव्हती. अशा टोकणधारक शेतकर्‍यांच्या तुरीची पडताळणी करून ती बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत ३१ ऑगस्टपर्यंत मोजून घेण्याचे शासनाने निश्‍चित केले. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात विविध केंद्रांवरील मिळून १४ हजार ५४२ शेतकर्‍यांची तब्बल २ लाख ८४ हजार क्विंटल तूर मोजणे बाकी होते. त्या सर्व शेतकर्‍यांची तूरू २७ जुलैपासून मोजून घेण्यास सुरुवात झाली. ही तूर मोजून घेताना बारदाणा किंवा साठवुणकीच्या अडचणीमुळे खरेदी बंद पडू नये म्हणून साठवण आणि बारदाण्याची जिल्हास्तरावरच नियोजन करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. तथापि, जिल्ह्यात तूर खरेदी सुरू झाली. त्यावेळी वखार महामंडळाच्या गोदामांत अतिशय कमी जागा शिल्लक होती. त्यामुळे खरेदी बंद पडू नये यासाठी जिल्हा उपनिबंधक, तसेच शासकीय खरेदीच्या जिल्हा व्यवस्थापकांनी वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधून अडीच लाख क्विंटल साठवणुकीसाठी गोदामे उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात तूर खरेदीसाठी गोदामांचे नियोजन करण्यात आले असून, सद्यस्थितीत एक लाख क्विंटल साठवणूक क्षमता असलेले एक खासगी गोदाम वाशिम येथे भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे. जिल्हाभरातील पाच शासकीय खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात आलेली तूर वाशिम येथील गोदामांत साठविण्यात येत आहे. त्याशिवाय दीड लाख क्विंटल साठवणूक क्षमतेचे गोदाम भाड्याने घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, येत्या चार ते पाच दिवसांतच हे गोदामही तूर साठवणुकीसाठी उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापक बी.एच. भाकरे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले. 

५0 हजार क्विंटल तुरीची मोजणीजिल्ह्यात टोकनधारक शेतकर्‍यांची तूर मोजून घेण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर ७ जुलैपर्यंत जवळपास ५0 हजार क्विंटल तुरीची मोजणी करण्यात आली असून, अद्यापही २ लाख ३0 हजार क्विंटल तुरीची मोजणी बाकी आहे. ही तूर येत्या १५ दिवसांत मोजली जाण्याचा विश्‍वास संबंधित अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.  जिल्हाधिकार्‍यांनी तुरीची मोजणी संथगतीने होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून तूर मोजणीला वेग देण्याच्या सूचना ६ ऑगस्ट रोजी दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी सर्वच तालुका सहाय्यक निबंधक आणि बाजार समित्यांसह संबंधित यंत्रणेला पत्र पाठवून जिल्हाधिकार्‍यांच्या सुचनेची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार तूर मोजणीला वेगही आला आहे.

सद्यस्थितीत तूर साठवणुकीसाठी १ लाख क्विंटल साठवण क्षमतेचे खासगी गोदाम भाड्याने घेण्यात आले आहे. त्याशिवाय दीड लाख क्विंटल साठवण क्षमतेच्या गोदामासाठी वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांकडे प्रस्तावही पाठविण्यात आलेला असून, येत्या चार पाच दिवसांतच त्याबाबत निर्णय होऊन गोदाम उपलब्ध होईल.-बी. एच. भाकरे, जिल्हा व्यवस्थापक