‘वृक्षाची छाया, वृद्धांची माया’, या संकल्पनेवर आधारित निरंकारी मिशनच्या या उपक्रमांतर्गत केवळ वृक्षलागवड करून न थांबता झाडांचे पुढील तीन वर्षे संगोपन करण्याची शपथही यावेळी घेण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने योजनेच्या यशस्वितेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. पहिल्या दिवशी १०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने हे प्रमाण वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती याप्रसंगी निरंकारी सेवादलचे जिल्हा इन्चार्ज दत्तात्रय बंडेवार यांनी दिली. कार्यक्रमास मिशनच्या वाशिम शाखेचे श्रीराम जाधव, प्रचारक नामदेव जाधव यांच्यासह शहरी वृक्ष समूह योजनेचे जिल्हा प्रमुख जनार्धन बोरकर, संतोष खोडे, सुनील बोरकर, सचिन सोनुने, महादेव इंगोले, माणिक राठोड, अक्षय अंभोरे व इतर सेवादलाचे स्वयंसेवक उपस्थित होते.
निरंकारी सेवादलकडून १०० वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:45 AM