लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तुंवर बंदी असतांना अनेक मंगल कार्यालयांमध्ये विविध समारंभात प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तुंचा वापर होताना दिसून येत आहे. यामुळे जाणवणारे दुष्परिणाम पाहता याचा वापर करणाºयांवर कडक कारवाईचे निर्देष जिल्हाधिकारी यांनी दिल्याने नगरपरिषदेच्यावतिने शहरातील सर्व मंगलकार्यालयांना नोटीस देण्यात आली आली आहे. यासंदर्भात लोकमतच्यावतिने २ व ३ जानेवारी रोजी यासंदर्भात वृत्तांकन केले होते.वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी वाशिम शहरातील मंगल कार्यालयांना दिलेल्या नोटीसव्दारे महाराष्टÑ शासनाव्दारे प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशिल वस्तुंचे उत्पादन वापर व विक्री बंदी घालण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी वाशिम शहरात सदर बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. त्या अनुषंगाने वाशिम शहरात कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. आपल्या मंगल कार्यालयात प्लास्टिक पिशवी, प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेले काटे, चमचे, द्रोण, ग्लास, प्लास्टिक कोटेड पत्रावळी, थर्माकोलचे द्रोण , पत्रावळी याचा वापर करुन नियमांचे पालन करणार नाहीत त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. २८ जून २०१८ पासून प्लास्टिक व अविघटनशिल कचरा (नियंत्रण) कायदा, २००६ नुसार नियमांचे पालन न करणाºयांवर पहिल्या गुन्हयाकरिता ५ हजार रुपये दंड, दुसºया गुन्हयाकरीता १० हजार दंड व तिसºया गुन्हयाकरिता २५ हजार रुपये दंड व तीन महिन्याचा कारावास अशी दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे शहरातील सर्व मंगलकार्यालयांना नोटीसव्दारे कळविण्यात आले आहे.
प्लास्टिक, थर्माकोल वापर; वाशिम येथील मंगल कार्यालयांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 3:57 PM