३२ वाहनांवर कारवाई
रिसाेड : दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३२ वाहनचालकांवर पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली.
मालेगाव-किन्हीराजा रस्त्यावर खड्डे
वाशिम : मालेगाव ते किन्हीराजा रस्त्यावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना संबंधितांकडून काेणत्याच प्रकारची दखल घेण्यात येत नसल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दरराेज वाहनांचे नुकसान व अपघात घडत आहेत.
वीजपुरवठा अनियमित
वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरातील गावठाण फिडरचे रोहित्र कुचकामी आणि कमी दाबाचे असल्याने वीजपुरवठा खंडित होत असून, अर्ध्या गावात अधूनमधून अंधार राहत आहे.
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम : सर्दी, खोकला, ताप, आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे.
वीज मीटरअभावी जोडण्या रखडल्या
वाशिम : रीतसर वीजजोडणीसाठी ग्राहकांची धडपड सुरू आहे. परंतु, महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीजमीटरच उपलब्ध नाही.