शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

पाच वर्षांपासून ‘विश्व रक्तदाता दिवस’ साजरा करणारा ‘मंच’

By admin | Published: June 14, 2017 2:45 AM

आज विविध ठिकाणी रक्तदान शिबिर : मारवाडी युवा मंच कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: १४ जून हा जागतिक रक्तदाता दिवस २००४ पासून साजरा केला जातोय. वाशिम येथील मारवाडी युवा मंच गत पाच वर्षांपासून या दिनी रक्तदान शिबिरे घेऊन रक्तदानाबाबत जनजागृती करीत आहेत. रक्तदान हे जगातील एक सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानासारखे दुसरे कोणतेही अमूल्य भेट नाही. त्यात गंमत अशी की ही भेट तुम्ही कोणाला देताय हे बहुतेक वेळा तुम्हाला माहीतही नसते. यापेक्षा दुसरे नि:स्वार्थी कृत्य नाही. १४ जून हा वर्ल्ड ब्लड डोनर डे (जागतिक रक्तदाता दिवस) म्हणून मानला जातो. ज्या व्यक्तींनी आजपर्यंत रक्तदान केले त्यांचे आभार मानण्याकरिता तसेच रक्तदानाचे महत्त्व लोकांना पटवून देण्याकरिता वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायजेशनने (जागतिक आरोग्य संस्था) २००४ पासून या दिवसाची सुरुवात केली आहे. हा दिवस वाशिम शहरातील मारवाडी युवा मंचच्यावतीने गत पाच वर्षांपासून अविरत राबविण्यात येत आहे. या दिवशी रक्तदान शिबिरासह जनजागृतीचे कार्य त्यांच्या हातून घडत आहे. तुमच्यातील अनेक जणांनी रक्तदान स्वत:हून किंवा गरजेपोटी केले असेल; मात्र रक्तदान कधी, कुठे, करावे, कोणती कोळजी घ्यावी या बाबी बघणेही तितकेच गरजेचे आहे. चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी, तसेच चुकीच्या मार्गदर्शनाखाली जर रक्तदान केले तर अनेक आजार होण्याचा धोका असतो. याबाबत या दिवशी या मंचच्यावतिने जनजागृतीही केल्या जाते. मारवाडी युवा मंचच्यावतीने १४ जून रोजी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत शहरातील अग्रसेन भवन, महेश भवन, जैन भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान तसेच इतरांना प्रोत्साहित करण्यसाचे आवाहन मारवाडी युवा मंचच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी मारवाडी युवा मंचचे सर्व पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.