रिसोड शहर मुख्य रस्ता, सिव्हिल लाइन या रस्त्याची दुर्दशा सोबतच नगरपरिषद हद्दीतील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था कायम आहे. शहरातील मुख्य रस्ता -वाशिम नाका- कालुशा बाबा दर्गा हा ९०० मीटर अंतर असलेला रस्ता अतिशय खराब झाला आहे. सदर रस्त्यावर खड्ड्याच्या साम्राज्य, तसेच धुळीचे वास्तव्य शहरांमध्ये चर्चेचा विषय बनलाय, तरीही प्रशासन या बाबीकडे गांभीर्याने घेत नाही. शहरातील सिव्हिल लाइन रस्त्यावरील जनता कॉलेजकडे जाणारा रस्ता, तहसील कार्यालयाची मागील बाजूला असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असताना, प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष आहे. ज्या भागामध्ये लोकवस्ती नाहीत, अशा ठिकाणी प्रशासनाने रस्त्याचे काम केले, परंतु सतत वर्दळ असणाऱ्या मार्गाकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप शहरवासी करीत आहे.
रिसोडातील अंतर्गत रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:44 AM