---------
देपुळात १२५ एकरवर बीजोत्पादन
अनसिंग : येथून जवळच असलेल्या देपूळ येथील २५ ते ३० शेतकऱ्यांच्या गटाने यंदा महाबीजच्या बीजोत्पादन प्रकल्पांतर्गत १२५ एकर क्षेत्रांवर सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. याचे उत्पादन चांगले झाले. यासाठी त्यांना महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांचे मार्गदर्शन लाभले.
--------
भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेलुबाजार : परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय भाजीपाला उत्पादन व विक्रीबाबत कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांची उपस्थिती होती.
---------
नदीच्या पुलावरील कठडे तुटले
कारंजा : कारंजा तालुक्यातील खेर्डा ते काजळेश्वर मार्गावरील उमा नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. सुमारे ४० वर्षांपूर्वी या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. सिमेंटचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने कठडे दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांतून हाेत आहे.
----------
महामार्गाचे काम रखडले
मंगरुळपीर : मंगरूळपीरदरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ चे काम पूर्ण झाले असले तरी दस्तापूरनजीक जवळपास १०० मीटर अंतरातील मार्गाचे काम अद्यापही झाले नाही. हा भाग वनविभागाच्या अखत्यारित येत असून, त्यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे काम रखडल्याचे महामार्ग प्राधिकरणकडून सांगितले जाते.