लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत आधीच विविध तांत्रिक घोळ असल्याने अनेक शेतकरी अद्याप या योजनेपासून वंचित आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांनी अचूक बँक खाते व अन्य माहिती दिल्यानंतरही अनुदानाची रक्कम अन्य शेतकरी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या संदर्भात शेतकºयांनी तहसीलस्तरावर तक्रारीही केल्या आहेत.कें द्र शासनाने शेतकºयांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकºयाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेत आता क्षेत्र मर्यादेची कोणतीही अट नसल्याने सर्व पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाच्या याद्या संकलित करून वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पीएम किसान पोर्टलवर माहिती अपलोड करण्याची तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी तलाठी अथवा ग्रामसेवकांकडून नोंदणी केली जात आहे. शेतकरी नाव, गाव, वय, व्यवसाय, खाते क्रमांक, क्षेत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यांसह स्वयंघोषणापत्र भरून तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे देत आहेत. दरम्यान, हजारो शेतकºयांनी संपूर्ण माहिती तलाठ्यांकडे देऊनही खात्यात निधी जमा झाला नसल्याबाबत चौकशी सुरू केली. त्यावेळी काही शेतकºयांची रक्कम दुसºयाच व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले. तलाठ्यांनी भरलेली माहिती अचूक असतानाही हा प्रकार घडत आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले असून, या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तक्रारी होऊनही शेतकºयांना मिळाला नाही लाभशेतकरी सन्मान निधीपासून वंचित असल्याने शेतकºयांनी चौकशी सुरू केली असता त्यांची रक्कम दुसºयाच शेतकºयांच्या खात्यात जमा झाली असल्याचे निदर्शनास आले. असा प्रकार घडलेल्या मानोरा तालुक्यातील काही शेतकºयांनी तहसीलदारांकडे तक्रारही केली. आता या तक्रारीला आठवडा उलटत आला तरी, त्यावर कोणतीही कार्यवाही करून शेतकºयांच्या खात्यात रक्कम अद्याप जमा करण्यात आली नाही.
यासंदर्भातील माहिती आपल्याला मिळाली आहे; परंतु खूप कमी शेतकºयांबाबत हा प्रकार घडला आहे. त्यातही अचूक माहिती भरल्यानंतर असा प्रकार घडत नाही. तथापि, या प्रकाराची चौकशी करून तांत्रिक दोष दूर करण्यासह संंबंधित शेतकºयांना त्याचा लाभ देण्यात येणारच आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी