मानोरा : किटकनाशक फवारणीमुळे मानोरा तालुक्यातील तीन जणांना विषबाधा झाली असून, २३ सप्टेंबर रोजी उपचारार्थ त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.किटकनाशक फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी, याबाबत कृषी विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. परंतू, ही जनजागृती व्यापक नसल्याने शेतकरी, शेतमजुरांना फारशी माहिती मिळत नाही. गत आठवड्यात मानोरा तालुक्यात सात जणांना किटकनाशक फवारणीनंतर विषबाधेची लक्षणे आढळली होती. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. २३ सप्टेंबर रोजी संतोष आत्माराम राठोड (३५) ३५, बंडु शंकर इंगोले (३८) रा.सिंगडोह व उद्दल लोभा पवार (४०) रा.आमदरी यांना उपचारासाठी दाखल केले. किटकनाशक फवारणी करतांना १० जणांच्या शरीरावर परिणाम झाल्याची नोंद ग्रामीण रुग्णालयात आहे. किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होणार नाही, यासाठी कृषी विभागाने ग्र्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, अशी अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.
किटकनाशक फवारणीमुळे तिघांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:42 PM