लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांना सेंद्रीय शेताच्या प्रयोगासाठी सहज निंबोळी ऊपलब्ध व्हावी, गावातील पर्यावरण स्वच्छ आणि शुद्ध राहावे म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) कृषी विभाग ११० गावात प्रत्येकी १०० झाडांची बाग तयार करणार आहे. गाव कृषी संजीवनी समिती या झाडांची देखभाल करणार आहे. त्यातच ऊत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यावगावांना पुरस्कारही देण्यात येणार आहे.पोक्रा अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने शेतक?्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे या पोकरा प्रकल्पा अंतर्गत विशेष करून अलीकडच्या काळात विविध कारणांमुळे घटणारे कृषी उत्पादन वाढविण्यासाठी तसेच सेंद्रिय शेती संदर्भात उपाययोजनावर भर देण्यात आहे यातच सेंद्रिय शेतीसाठी निबोळीवर आधारित विविध घटक पदार्थ, कंपोस्ट बनविण्यासाठी मोठया प्रमाणात निंबोळी आवश्यक असते, ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने पोक्रा अंतर्गत "नीम पार्क' निर्मितीचा सकल्प केला आहे. या "नीम पार्क' प्रकल्पात ग्रामपंचायत हद्दीत येणा?्या इ क्लास किंवा शासकीय जमिनीवर प्रत्येकी १०० याप्रमाणे ११० गावात कडुनिंबाची ११ हजार झाडे गाव संजीवनी समिती मार्फत लावण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाकडून आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे साधारण 11 वषार्नंतर या झाडापासून मिळणा?्या निंबोळी चा वापर विविध पदार्थ बनवून संबंधित गावातील शेतकय्रांना साठी गाव समितीचे अंतर्गत केला जाणार आहे. यामुळे गावातील पर्यावरण स्वच्छ आणि शुद्ध होण्यासाठी मदत मिळणार आहे सद्यस्थितीत ८ गावात यी प्रकल्पाच्या निर्मितीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
‘नीम पार्क’मध्ये कुंपण आणि बेंचची व्यवस्थानानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ११० गावांत होणाºया ‘नीम पार्क’मध्ये विरंगुळा म्हणुन वेळ घालविण्यासाठी येणाºया ग्रामस्थांना बसण्याची सोय म्हणून बेंच ठेवण्यात येणार आहेत, तसेच या जागेचा दुरुपयोग होऊ नये, तेथे घाण कचरा पसरू नये म्हणून कुंपनही लावण्यात येणार आहे