शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मंगरुळपीर तालुक्यात पोलीसही सरसावले जलसंधारणाच्या कामासाठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 1:36 PM

मंगरुळपीर: वॉटर कप स्पर्धेंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी झटणाऱ्या ग्रामस्थांना हातभार लागावा, त्यांचा उत्साह वाढावा म्हणून मंगरुळपीरचे पोलीस प्रशासनही सरसावले आहे.

ठळक मुद्देजलमित्र नोंदणी मोहिम राबवून १ मे रोजी महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन केले.ग्रामस्थांचा उत्साह वाढावा आणि त्यांना थोडा हातभारही लागावा, या उद्देशाने पोलीस प्रशासनाने येथे महाश्रमदानात सहभाग घेतला. रचनात्मकपध्दतीने केलेले दगडीबांध, कटुरबांध, शेततळे आदि कामांची पाहणी पोलिसांनी करुन त्यांचे कौतूक केले.

मंगरुळपीर: वॉटर कप स्पर्धेंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी झटणाऱ्या ग्रामस्थांना हातभार लागावा, त्यांचा उत्साह वाढावा म्हणून मंगरुळपीरचे पोलीस प्रशासनही सरसावले आहे. मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी आणि ठाणेदारांसह ३५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील आदर्श ग्राम सायखेडा येथे १ मे रोजी दुपारी ४.३० वाजतापासून श्रमदान केले. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांचा उत्साह कमालीचा वाढून त्यांना श्रमदानासाठी बळ आल्याचे दिसले.  वॉटर कप स्पर्धेंतर्गत मंगरुळपीर तालुक्यात सहभागी गावांत श्रमदानाची जणू लाटच उसळली आहे. गावातून पाणीटंचाई कायम हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थ झपाटले आहेत. विविध गावांत सकाळी, सायंकाळी प्रत्येकी चार तास संपूर्ण गाव श्रमदान करीत आहेत. या ग्रामस्थांचा उत्साह वाढावा म्हणून पाणी फाऊंडेशनने नागरी भागातील जनतेला हाक दिली आणि यासाठी जलमित्र नोंदणी मोहिम राबवून १ मे रोजी महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन केले. या मोहिमेला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी गावागावात श्रमदान केले. तालुक्यातील सायखेडा येथेही श्रमदानाची ही लाट पाहायला मिळाली. विशेष म्हणजे जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाºया पोलीस प्रशासनानेही यात सहभाग घेत श्रमदना करून ग्रामस्थांचा उत्साह वाढविला. जवळपास दोन तास पोलिसांनी येथे श्रमदान केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव म्हणाले की. सायखेडा गाव दुष्काळमुक्त व्हावे यासाठी ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहेत. त्यांनी श्रमदानातूनच विविध प्रकारच्या बांधबदिस्तीसह पाणलोट उपचाराची कामे केली आहेत. यामुळे भावी काळात हे गाव पाणीदार होईल, यात तिळमात्र शंका उरली नाही. या ग्रामस्थांचा उत्साह वाढावा आणि त्यांना थोडा हातभारही लागावा, या उद्देशाने पोलीस प्रशासनाने येथे महाश्रमदानात सहभाग घेतला. ठाणेदार रमेश जायभाये म्हणाले की, पोलीस प्रशासन जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडतेच; परंतु जनतेच्या भल्यासाठी गरज पडल्यास इतरही कामे करण्यास पोलीस तत्पर असतात. सायखेडा येथे श्रमदान करून आम्ही त्याची प्रचिती दिली. दरम्यान, गावकºयांनी रचनात्मकपध्दतीने केलेले दगडीबांध, कटुरबांध, शेततळे आदि कामांची पाहणी पोलिसांनी करुन त्यांचे कौतूक केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कांबळे, खांदवे, सरपंच विद्या गहुले, देवमन गहुले, उपसरपंच मनिष गहुले, युवराज गहुले, डिंगाबर काळे, गजानन गहुले, कृषी सहाय्यक वासुदेव चव्हाण, वॉटर हिरो नारायण अव्हाळे, दूर्गा मोरे, डिंपल भगत, विजय पारवे आदिंनीही श्रमदान केले. यादरम्यान  कार्यक्रमाचे संचालन नारायण अव्हाळे यांनी केले, तर आभार मंगेश गहुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसर्व वाटर हिरोज गावकºयांनी पुढाकार घेतला होता.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाMangrulpirमंगरूळपीर