वाशिम : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्रं-दिवस जनतेचे रक्षण करणार्या जिल्हाभरातील पोलीस कर्मचार्यांना जुलै महिण्याचा पगार २४ ऑगस्ट पर्यंत मिळाला नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. यामुळे शेकडो पोलीसांचे कुटूंब आर्थिक अडचणीत अडकले आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी पोलीस कर्मचारी जीवाचे रान करून कर्तव्य बजावतात. अनेक पोलीस कर्मचार्यांना शासकीय निवास नसल्याने ते भाड्याच्या खोलीमध्ये राहुन आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करतात. वाशिम जिल्हा पोलिस दलामध्ये अनेक वेळा पोलीस कर्मचार्यांना १५ तारखेनंतरच पगार मिळत असल्याने त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील १३ पोलिस स्टेशनपैकी तब्बल ९ पोलीस स्टेशनमधील कर्मचार्यांचे पगार अद्यापही झाले नाही. यामध्ये वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा शहर, धनज, रिसोड, जऊळका व अनसिंग या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. पोलीस कर्मचार्यांचे पगार न झाल्यामुळे त्यांना किराणा, घराचे भाडे, मुलांच्या शैक्षणीक फी ईत्यादी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पोलीस कर्मचार्यांना मित्रांकडुन पैशाची उसणवारी करून आपला उदरनिर्वाह भागवीण्याची वेळ आली आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. यामुळे अनेक कर्मचार्यांची मानसिकता कमकुवत झाल्याचे स्पष्ट जानवत आहे. दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी व लिपीकांचे पगार वेळेवर कसे होतात ? ही ओरड आहे. पालीस कर्मचार्यांवरच हा अन्याय का. असा प्रश्न कर्मचार्यांना सातत्याने सतावत असल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कर्मचार्यांचे पगार किमान १0 तारखेपर्यंत होणे अपेक्षीत आहे. कर्मचार्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कार्यालय अधिक्षक के.जी. बावणे यांचेवर प्रचंड नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
पोलीस वेतनाच्या प्रतीक्षेत!
By admin | Published: August 25, 2015 2:27 AM