कारंजा, दि. २0-पूर्ववैमनस्यातून येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवार, १७ मार्च रोजी स्थानिक जुन्या विठ्ठल मंदिर चौकात घडली होती. दोन्ही गटाच्या परस्परविरोधीनुसार शहर पोलिसांनी एकूण ११ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करीत पाच जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने २१ मार्चपयर्ंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, याच प्रकरणात रविवारी आणखी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. उमेश रमेश वाघेकर असे त्याचे नाव आहे. दीड वर्षांपूर्वी कारंजा शहरात उसळलेल्या दंगलीत एका जणाचा मृत्यू झाला होता. या घटनेवरून शुक्रवार, १७ मार्च रोजी दोन वेगवेगळ्या जातीचे गट आमने-सामने आले. दोन्ही गटांत हाणामारी आणि दगडफेकीचे प्रकारही झाले. या घटनेत दोन्ही गटातील प्रत्येकी तीन जण मिळून एकूण सहा जण जखमी झाले. त्यानंतर जुन्या विठ्ठल मंदिर परिसरातील घरांवर काही व्यक्तींच्यावतीने दगडफेक करण्यात येऊन दोन दुचाक्या व एका चार चाकी वाहनाची जाळपोळही करण्यात आली. परंतु, शहर पोलिसांनी लवकरच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या प्रकरणी श्रावण जांगिड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी पाच जणांवर, तर नूर मोहम्मद खान जुम्मा खान यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. कारंजा शहर पोलिसांनी रात्रीतून पाच आरोपींना अटक करून शनिवारी न्यायालयासमोर उभे केले. त्या सर्वांना २१ मार्चपयर्ंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय पोलिसांनी रविवारी आणखी एका आरोपीस अटक केली आहे.
हाणामारीप्रकरणी पाच आरोपींना पोलीस कोठडी
By admin | Published: March 21, 2017 3:04 AM