धनज पोलीस ठाणे हे जिल्ह्याच्या सीमेवर असून, कामरगाव व धनज या गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात छुप्या स्वरूपात अवैध धंदे सुरू आहेत. यामुळे अल्पवयीन व तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी लक्ष देऊन या छुप्या अवैध धंद्यांवर आळा घालावा , अशी मागणी जनता करीत आहे. दरम्यान, धनज पोलिसांनी १३ व १५ ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान कामरगाव व धनज खुर्द येथे छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा मारत ३४५० रुपये रोख रकमेसह जुगार व वरलीचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी श्याम बापुराव माहुरे, मनोज सुरेश कैकाडी, रोशन सुरेश कैकाडी, नितीन पारवे, कामरगाव व श्यामराव बाबाराव खरबडकर, गजानन पांडुरंग पवार रा. धनज खुर्द यांच्यावर जुगारबंदी कायदा कलम १२ अनुसार कारवाई केली. धनज पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक कपिल म्हसके यांच्या मार्गदर्शनाखाली श्यामल ठाकूर, गजानन वानखडे, सुनील वाणी, आकाश खंडारे यांनी ही कारवाई केली.
पोलिसांची अवैध जुगार, वरली अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:42 AM